पनामा सिटी
पनामा सिटी : मध्य अमेरिकेतील पनामा प्रजासत्ताकाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर. लोकसंख्या ४,२७,७०० (१९७७ अंदाज). हे पॅसिफिक महासागराच्या बाजूस पनामाच्या आखातावर वसले असून, देशातील प्रमुख व्यापारी पेठ, औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून त्याला फार महत्त्व आहे.